LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बेळगावत इस्कॉनची हरेकृष्ण यात्रोत्सव शनिवारी-रविवारी : शनिवारी दुपारी रथयात्रा : भक्तीरसामृत स्वामीनी दिली माहिती

बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ (इस्कॉन) च्या वतीने येत्या शनिवार व रविवारी भक्ती पूर्ण वातावरणात 27 वा हरेकृष्ण रथयात्रोत्सव संपन्न होणार असून हजारो भक्तगण यात्रोत्सव कार्यक्रमात भाग घेणार आहेत. इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष प. पू भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी ही माहिती दिली आहे.



इस्कॉनच्या रथयात्रेबाबत बोलताना ते म्हणाले की,
पाटणा येथे सर्वप्रथम इस्कॉनची रथयात्रा सुरू झाली. सुरुवातीला यात्रेमध्ये केवळ शेकडो लोक सहभागी व्हायचे पण त्यानंतर हजारो लोकांचा सहभाग यात वाढला असून आता ही यात्रा जगातील अनेक देशांमध्ये दरवर्षी साजरी केली जाते. भारतामध्ये तर अनेक शहरांमध्ये ही रथयात्रा साजरी होत असून तो त्या त्या शहराचा उत्सव बनत आहे. बेळगावात या रथयात्रेची सुरुवात 1998 साली करण्यात आली. गेल्या 27 वर्षापासून कोणताही खंड न पडता ही रथयात्रा अखंडपणे सुरू आहे. येथेही सुरुवातीला फक्त शहरातील काही भक्त सहभागी व्हायचे मात्र आता या रथयात्रेचे लोण जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात सगळीकडे पसरले असून देश विदेशातून काही भक्त या रथयात्रेत दरवर्षी सहभागी होत आहेत.
ओरिसाचे जगन्नाथ मंदिर हे चार पवित्र स्थानांपैकी एक आहे. येथे श्री कृष्णासह श्री हरी विष्णूचा आठवा अवतार, त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची पूजा केली जाते. एकदा सुभद्रादेवीने आपल्या बंधुंना मावशीच्या घरी गुंडीचा येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा भगवान जगन्नाथ व भगवान बलभद्र यांनीही तिच्याबरोबर रथातून जाण्याचे ठरवले आणि तेथे त्यांनी सात दिवस वास्तव्य केले. तेव्हापासून ही यात्रा सुरू असल्याची आख्यायिका ऐकावयास मिळते.
जगन्नाथाचे मुख्य मंदिर ओरिसाची पुरी येथे आहे, जी पुरुषोत्तम पुरी म्हणूनही ओळखली जाते. राधा आणि श्री कृष्णाच्या युगल मूर्तीचे प्रतीक स्वतः श्री जगन्नाथ आहेत. ओरिसामध्ये भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या अर्धाकृती मूर्ती स्थापित केल्या आहेत, ज्या इंद्रद्युम्न राजाने बांधल्या होत्या. भगवानांची रथयात्रा आषाढ शुक्ल द्वितीयेला जगन्नाथ पुरी येथे सुरू होते आणि दशमी तिथीला समाप्त होते.



बेळगावातील यंदाचा रथयात्रा कार्यक्रम-
शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.45 वाजता धर्मवीर संभाजी चौक (बोगारवेस) येथे भाविकांचा मेळावा, दुपारी 1.30 वाजता देश-विदेशातून आलेल्या ज्येष्ठ भक्तांच्या हस्ते आरती व मिरवणुकीला सुरुवात होईल.


रथयात्रा मार्ग - ध. संभाजी चौक, कॉलेज रोड, समादेवी गल्ली, खडे बाजार, शनिवार खुट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, पाटील गल्ली मार्गे रेल्वे ओव्हर ब्रीजवरुन कपिलेश्वर रोड, एसपीएम रोड, खडे बाजार, शहापूर, नाथ पै सर्कल, बीएमके आयुर्वेदिक कॉलेज रोड, गोवावेस मार्गे इस्कॉनच्या मागे असलेल्या मैदानावर संध्याकाळी ६.३० वा. पोहचल्यानंतर किर्तन, ज्येष्ठ सन्याशांची प्रवचने आणि सर्वांसाठी महाप्रसाद.
रथयात्रेमध्ये सजवलेल्या बैल जोड्या आणि बैलगाड्या भाग घेणार असून भगवद्गीतेवर आधारित विविध प्रसंग दर्शवणारे चित्ररथ सहभागी झालेले असतील. रथयात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी पुष्पवृष्टी होणार असून भाविकांना पाणी, सरबत आणि फळांचे वाटप केले जाणार आहे.
संपूर्ण मार्गावर अतिशय सुंदर अशा रांगोळ्या घातल्या जाणार असून त्यासाठी एक संपूर्ण युनिट कार्यरत आहे.
श्री राधा गोकुलानंद मंदिराच्या पाठीमागील बाजूस भव्य असे मंडप उभारण्यात येत असून तेथे भगवत गीता प्रदर्शन, स्लाईड शो, मेडिटेशन पार्क, गो सेवा स्टॉल, अध्यात्मिक पुस्तकांचे प्रदर्शन, युवकांना मार्गदर्शन करणारे स्टॉल राहणार आहेत.
मंदिरास भेट देणाऱ्या सर्वांसाठी दोन्ही दिवस रात्री महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येत आहे.
रथयात्रेच्या निमित्ताने अनेक कमिट्या नियुक्त करण्यात आले असून त्या सर्व कमिट्या जोमाने कामास लागल्या आहेत. या पत्रकार परिषदेच्या वेळेला समितीचे अध्यक्ष बालकिशन भट्टड व ज्येष्ठ भक्त एच डी काटवा हेही उपस्थित होते
रविवारचे कार्यक्रम
रविवार दि.2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.30 ते 5.30 पर्यंत नरसिंह यज्ञ ज्यामध्ये अनेक भक्त सहभागी होतात. 6.30 ते 10 वा. पर्यंत भजन, किर्तन, प्रवचन, नाट्यलिला आणि सर्वांसाठी महाप्रसाद.
वरील सर्व कार्यक्रमात भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती