LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बसनगौडा पाटील-यत्नाळ निलंबनामुळे पंचमसाली लिंगायत नाराज

विजापूर : भाजपने बसनगौडा पाटील यत्नाळ यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पंचमसाली लिंगायत नाराज झाले असून त्यांचे निलंबन चुकीचे असल्याचे पंचमसाली लिंगायत समाजाचे जय मृत्युंजय स्वामीजीं यांनी म्हटले आहे.


स्वामीजींनी भाजप हाय कमांडच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली असून यामुळे भाजपला भविष्यात मोठी किंमत द्यावी लागणार आहे, असे सूतोवाचही स्वामीजींनी केले आहे.


बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी भाजपविरोधात कोणतेही चुकीचे विधान केलेले नाही. तसेच त्यांनी पक्षाच्या विरोधात कामही केलेले नाही. तरीही त्यांना पक्षातून बाहेर काढण्याचा भाजप हाय कामांडने निर्णय चुकीचा असे स्वामीजींनी म्हटले आहे.
असे करून भाजप स्वतःच आपल्या पायावर दगड टाकून घेत आहे, याबद्दल भाजपला भविष्यात मोठी किंमत मोजावी लागणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे
पक्षातील काही सत्तालोलुप आणि भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी हा निर्णय घडवून आणला आहे, असा आरोप करीत यत्नाळ यांनी नेहमीच समाजहितासाठी तसेच सत्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. यत्नाळ हे निडर आणि स्पष्टवक्ते नेते आहेत. यत्नाळ हे अन्यायाविरुद्ध लढत होते आणि म्हणूनच त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.


भाजपने पंचमसाली समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही असा आरोप करीत, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनीही या समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असे ते म्हणाले.
भाजपने सध्या 66 जागा जिंकल्या असल्या तरी आगामी निवडणुकांमध्ये त्यांचे संख्याबळ कमी होऊन ती संख्या 33 पर्यंत खाली येईल अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.


भाजपच्या या निर्णयामुळे पंचमसाली लिंगायत समाज आणि पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा भविष्यात भाजपला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल, असेही स्वामीजींनी स्पष्ट केले आहे.


पंचमसाली लिंगायत समाजातून या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत असून यत्नाळ यांच्या समर्थनार्थ समाजाच्यावतीने आंदोलन छेडले जाण्याची शक्यता आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती