LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

आणि अखेर कॅन्सरविरोधातील झुंज प्रिया हारली : अवघ्या 38 व्या वर्षी तिने घेतला जगाचा निरोप ...!!

मुंबई : ' पवित्र रिश्ता ’ या मालिकेतील मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे आज वयाच्या 38 व्या वर्षी निधन झाले.
अभिनेत्री प्रिया मराठे ही कर्करोगाने पिडीत होती. अखेर कर्करोगाविरोधातली झुंज ती हारली. आज रविवार 31 ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता तिने अखेरचा श्वास घेतला.


नाटकात तसंच टिव्हीवरील अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये प्रियानं काम केलं होतं.
'चार दिवस सासूचे', 'या सुखांनो या', 'पवित्र रिश्ता', 'बडे अच्छे लगते है', अशा मालिकांत तिनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. 'तुझेच मी गीत गात आहे' ही तिची अखेरची मालिका तर 'अ परफेक्ट मर्डर' हे शेवटचं नाटक ठरलं. पवित्र रिश्ता या मालिकेतील तिचा अभिनय विशेष छाप पडणारा होता.


प्रिया ही मूळची ठाण्याची. शूटिंगसाठी ती अंधेरीत राहत असे. तिची रूममेट शर्वरी लोहकरेमुळे तिची शंतनूबरोबर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि दीड वर्षांच्या लव्हस्टोरीनंतर 24 एप्रिल 2012 रोजी प्रिया ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघेंची सून झाली. श्रीकांत मोघे यांचा मुलगा व अभिनेता शंतनू मोघे याच्याबरोबर प्रियाचे अगदी थाटात लग्न झाले.



नाटकाचं व्यासपीठ आणि छोटा पडदा गाजविणाऱ्या प्रियाला कॅन्सरने घेरले आणि यामध्ये अवघ्या 38 व्या वर्षी तिने जग सोडले. तिच्या निधनाने केवळ मोघे कुटुंबियांवरच नाही तर संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती