LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

आणि 135 दिवसानंतर खणून बाहेर काढला दफन केलेला मृतदेह ....!

काझीपूर :दफनभूमीत दफन करण्यात आलेला मृतदेह तब्बल 135 दिवसानंतर खणून दफनभूमीतून बाहेर काढण्यात आला आणि एका रहस्यमयी खुनाचा छडा लागला.
उत्तर प्रदेशमधील घोसी कोतवाली येथील काझीपूर येथे ही घटना घडली आहे.


मृत महिलेच्या बहिणीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि मग न्यायालयाच्या आदेशानुसार जेसीबीद्वारे जमीन खोदून दफनभूमीत पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. न्यायालयाच्या सूचनेनुसार मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. आणि या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली.


महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिला काझीपूर दफनभूमीत दफन करण्यात आले. पण मृताच्या बहिणीने हा आपल्या बहिणीचा मृत्यू नैसर्गिक नसून आपल्या पतीनेच तिची हत्या केल्याचा दावा केला. न्यायालयाच्या आदेशानुसार 135 दिवसानंतर उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) घोसी यांच्या देखरेखीखाली एक संयुक्त पथकाच्या उपस्थितीत तिचा मृतदेह दफनभूमीतून बाहेर काढण्यात आला. न्यायालयाने मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले असून त्याअनुषंगाने पुढील प्रक्रिया सुरू आहे. तीन डॉक्टरांचे पथक त्याचे परीक्षण करणार आहे.


मी गरोदर असल्याने नोव्हेंबर 2024 मध्ये माझी काळजी घेण्यासाठी ती माझ्या घरी आली होती. 30 नोव्हेंबर रोजी आपल्याडोळ्यादेखत आपल्या बहिणीवर माझ्या पतीकडून बलात्कार झाला. तिच्यावर बलात्कार करून त्या प्रकाराचा अश्लील व्हिडीओही बनवल्याचा गंभीर आरोप करीत मृत महिलेच्या बहिणीने न्यायालयात धाव घेत, आपल्या पतीनेच माझ्या बहिणीची हत्या केल्याचा दावा केला होता. त्यानुसार न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये दफन केलेला मृतदेह खणून बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनानंतर सत्य उघड होणार आहे.
सध्या मृत महिलेचा पती सध्या तुरुंगात आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती