LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' जीवनविद्येचे आदर्श - छत्रपती शिवाजी महाराज ' : व्याख्यानाचे आयोजन

बेळगाव : सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन, शाखा बेळगाव, उपकेंद्र वडगाव यांच्यावतीने श्री वामनराव पै यांच्या जन्म शताब्दीचे औचित्य साधून ' जीवनविद्येचे आदर्श - छत्रपती शिवाजी महाराज ' या खास व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
पाचगणी महाबळेश्वर येथील नामवंत व्याख्याते श्री भरत पांगारे हे मार्गदर्शन करणार असून यामध्ये जीवनविद्येच्या दृष्टीकोणातून आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे विविध पैलू उलघडून दाखवणार आहेत.



सद्याच्या युवा पिढीला शिवाजी महाराजांचे स्वभाव दर्शन, त्यांचा त्याग व असामान्य कर्तृत्व, त्यांचे समाजभान यांची जाणीव होऊन युवा पिढीला स्वतः प्रति, कुटुंब, समाज व राष्ट्रा प्रति कर्तव्याची जाणीव व्हावी या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.



वडगाव उपकेंद्राचा दहावा वर्धापन दिन व नामधारक कै.चांगदेव देसाई यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम असून सदर कार्यक्रम शनिवार दि. 28 डिसेंबर 2024 रोजी सायं. ठीक 5.30 ते 8.30 या वेळेत श्री. मंगाईदेवी देवस्थान, पाटील गल्ली, वडगाव येथे संपन्न होणार आहे.
हरिपाठ, संगीत जीवनविद्या व मार्गदर्शन असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
सदर कार्यक्रम विनामूल्य असून समस्त बेळगावकरांनी खास करून युवा वर्गाने मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती