LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

मेंढपाळांना दिले जाणार बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण

बागलकोट : चोरांच्या वाढत्या उपद्रवापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी बागलकोट येथील मेंढपाळांना पोलीस खात्याकडून बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या मेंढपाळांना बंदूक परवाने उपलब्ध करून दिले जाणार आहेत, असे बागलकोट जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांनी सांगितले आहे.

9 मार्च रोजी शरणाप्पा जन्मनकट्टी हा मेंढपाळ शिवारात बकरी चारत असताना तिघा बकरी चोरट्यानी बकरी चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी मेंढपाळ शरणाप्पा याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्या तिघांनी शरणाप्पावर हल्ला केला. चोरट्यानी शरणप्पाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला आणि ते फरार झाले. या घटनेचे तीव्र पडसाद बागलकोट जिल्ह्यात उमटले होते. ही घटना ताजी असतानाच बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील अरभावी-संगणकेरी गावाबाहेर बकरी चोरट्याने एका मेंढपाळाच्या पायावर वार करून त्याचा पायच कापल्याची भयानक घटना उघडकीस आली. मेंढ्या चोरण्यासाठी आलेल्या चोरट्याला मेंढ्या चोरण्यास रोखणाऱ्या मेंढपाळाच्या पायावर शस्त्राने वार करून चोरट्याने हुक्केरी येथील बसप्पा गुरुवन्नावर नामक मेंढपाळाचा पाय कापला. या घटनेने मेंढपाळामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून मेंढपाळांवर हल्ल्याच्या घटना वाढल्याने मेंढपाळानी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस प्रमुख आणि पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन मेंढपाळानी संरक्षणाची मागणी केली होती.
याची गांभीर्याने दखल घेत शरणप्पा खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, बागलकोट पोलिसांनी मेंढपाळांसाठी बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे.


प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक मेंढपाळांना बागलकोट पोलीस खात्याकडून बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या मेंढपाळांना बंदूक खरेदीसाठी बंदूक परवाने मिळवून दिले जाणार आहेत, असे बागलकोट जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांनी म्हटले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती