LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

मराठी भाषिकांनी मुख्य प्रवाहात यावे : सतीश जारकीहोळी यांचे आवाहन

बेळगाव : 30 वर्षांपूर्वीच सीमाप्रश्न सुटलेला आहे. आता मराठी भाषिक लोकांनी मुख्य प्रवाहात यावे असे आवाहन करीत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मराठी भाषिकांच्या भावनांवर मीठ चोळले आहे.


महाराष्ट्र एकीकरण समितीचा निषेध करून अथवा समितीवर बंदी आणून सीमावादाची समस्या सुटणार नाही. समितीवर बंदी आणली की आणखीन वेगळ्या नावाने ते चळवळीत सक्रिय होण्याची शक्यता आहे, असे वक्तव्य करताना 30 वर्षांपूर्वीच सीमाप्रश्न संपलेला आहे. आता केवळ शासनाने योजनाबद्धरित्या वाटचाल करून यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी म्हटले आहे.ते इतक्यावरच थांबले नाहीत तर मराठी लोकांनी मुख्य प्रवाहात यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.



आजच्या कर्नाटक बंद च्या हाकेबद्दल बोलताना त्यांनी,
प्रत्येकाला निषेध करण्याचा अधिकार आहे. तथापि, सामान्य लोकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दखल घेत निषेध केला तर बरे . महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालल्याने वाद सुटणार नाही. जर समितीवर बंदी घातली गेली तर ते पुन्हा वेगळ्या नावाने सक्रिय होण्याची शक्यता आहे. यासाठी सरकारनेच कार्यक्रमाचे नियोजन आणि नियमन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे म्हटले.
सीमेवर महाराष्ट्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांसंदर्भात बोलताना जारकीहोळी म्हणाले , त्या योजना येथील मराठी भाषिकांच्या हिताच्या नाहीत. महाराष्ट्र सरकारने योजना जाहीर केल्या असतील, पण त्यांचा लाभ सर्वांनाच मिळत नाही. राज्य सरकारच्या योजना सर्व भाषिकांपर्यंत पोहोचत आहेत, असे ते म्हणाले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती