LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' फॉलोअर ' चित्रपटावर करवेच्या शिवरामेगौडा कंपूची वक्रदृष्टी : म्हणे, चित्रपट सीमा वाद निर्माण करणारा

बेळगाव : बेळगावच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या' फॉलोअर ' चित्रपटावर करवेच्या शिवरामेगौडा कंपूची वक्रदृष्टी पडली असून सीमा वाद निर्माण करणारा चित्रपट असल्याचा आरोप करीत या कंपूने हा चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडले.


बेळगावच्या आयनॉक्स सिनेमागृहात, काल शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे . हा चित्रपट सीमावाद निर्माण करणारा असल्याचा आरोप करीत कर्नाटक रक्षक वेदिकाच्या शिवरामेगौडा गटाने निदर्शने करीत चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडले. चित्रपटाचे प्रदर्शन रद्द झाल्यानंतर चित्रपट गृह संचालकाने चित्रपट पाहण्यास आलेल्या लोकांचे तिकिटाचे पैसे परत केले.


रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फॉलोअर चित्रपटाचा प्रीमियर शो झाला असून जगभरातील लोकांनी या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. अशा या चित्रपटात करवेच्या शिवरामेगौडा कंपूला नेमका सीमावाद कुठे दिसला कळले नाही. या कंपूने बेळगावच्या आयनॉक्स सिनेमागृहासमोर निदर्शने करीत चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडले.


बेळगाव मध्ये बी.ई. शिक्षण घेणारा विद्यार्थी हर्षद नलवडे याने फॉलोअर हा चित्रपट निर्माण केला आहे. बेळगावच्या लोकांनी, चित्रपट बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटात बद्दल बोलताना चित्रपट निर्माण करणाऱ्या तुकडीने, तीन मित्रांवर आधारित हा चित्रपट आहे. रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा प्रीमियर शो झाला आहे.. हा चित्रपट सीमा वाद निर्माण करणारा असल्याचा आरोप साफ चुकीचा आहे, असे म्हटले आहे.


तर करवे कंपूने हा चित्रपट सीमावाद निर्माण करणारा आहे,असा आरोप करीत चित्रपटावर वक्रदृष्टी टाकताना अप्रत्यक्ष रित्या बेळगावमधील चित्रपटगृहात कन्नड चित्रपट दाखविले जात नाहीत, ही खंत व्यक्त केली आहे. बेळगाव मधील सिनेमा गृहात कन्नड सोडून मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपट दाखवले गेले तर चित्रपटगृहच बंद पाडण्याचा इशारा या करवे कंपूने देत आपली गरळ ओकली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती